रविवार, २० मे, २०१२

आज ही मी त्या खिडकीत जातो..
तोच रोजचा तुझा रस्ता पाहतो ....
सारे काही तेच वाटते ....
फक्त माझी ''ती कुणी '' आता रस्ता बदलून जाते ....

-मी शब्दसखा
आज ही शहारा येतो ...
जेव्हा आठवणीचा पाऊस सुरु असतो ...
तुझ्यापासून दूर असून ही ....
तू जवळ अगदी श्वासांच्या असल्याचा भास करून देतो ...
मला असे नेहमी वाटते
कविता लिहितो जिच्यामुळे तिला सांगावे...
पण तिला मी कधीच सांगत नाही...
मी नेहमीच पाहत असतो तिलाच..
तिचीच नजर माझ्याकडे वळत नाही..

शब्द सरिता .... मनातल्या कविता


https://www.facebook.com/pages/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-/132138243525814


जर आवडले लिखाण माझे तर नक्कीच जॉईन करा हे पेज आपली वाट पाहीन धन्यवाद ...

तसेच आता मला तुम्ही youtube वर हि भेटू शकता ते वरील video च्या लिंक वर क्लिक करा आणि अभिप्राय कळवा...

-मी शब्दसखा
तुझ्या पैजणांचा नाद रोज ऐकतो ..
मनात त्याने तरंग उठून जातो ...
त्या एका क्षणासाठी मग सारा निसर्गही शांत स्थब्ध होतो ...
जेव्हा प्रेमाने तुझा पाय ताल धरतो ...
दंग होऊन डोलू लागतो साठवत राहतो मग मनात ...
असे जेव्हा होते तेव्हा निसर्ग सजीव पण सोडून वागतो ...

रविवार, २ ऑक्टोबर, २०११

https://www.facebook.com/pages/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-/132138243525814    


जर आवडले लिखाण माझे तर नक्कीच जॉईन करा हे पेज आपली वाट पाहीन धन्यवाद -मी शब्दसखा

आरसा ... कवितेचा

आरसा देतोय तुला काव्याचा
स्वताला जरा नीट वाच..

कविता जरी माझ्या उल्लेख प्रेमाचा तरी तुझ्याच..
तुझ्यचं मनाची त्या आहे खरी आच..
... आरसा देतोय काव्याचा..

तू विसरशील स्वताला
काजळ जवळ ठेव ..
फवारे उडतील प्रेमाचे
तुषार त्याचे ओंजळीत ठेव..
वेळ येयील प्रेमात पडण्याची
कारण वारंवार उल्लेच त्याचाच..

म्हणून आरसा देतोय काव्याचा..

रोज बघतेस न्याहाळून
आज शब्दात शोध स्वताला..
प्रत्येक ओळीवर, शब्दांत मग नवी
भास्शील तुझ्याच मनाला..
यात नाही अतिशयोक्ती
नाही कला लावली पणाला..
हा तर प्याला आहे सौंदर्याचा तुझ्याच..

म्हणून आरसा देतोय काव्याचा ..

रोज सजतेस स्वतःसाठी
आज माझ्यासाठी सजून बघ..
सजता नाहीच आल तर
कवितेत माझ्या भिजून बघ..
बघ अविष्कार तुझ्या प्रेमाचा
संसार माझ्या तुझा आणि माझ्या कल्पनांचाच..

म्हणून आरसा देतोय तुला प्रेमाचा ....
स्वताला जरा नीट वाच..

कविता जरी माझ्या उल्लेख प्रेमाचा तरी तुझ्याच..
तुझ्यचं मनाची त्या आहे खरी आच..
आरसा देतोय ...जरा नीटच वाच...

-मी शब्दसखा
२२/०२/२००५
(आठवणीतल्या कविता)

बुधवार, २५ मे, २०११

मला खूप आवडते तुला पावसात भिजवायला ....
भिजत भिजत मग तुला लहान झालेले पाहायला ...
मला खूप आवडते तुला डोळ्यासमोर ठेवायला ....
भिजून झाल्यानंतर आडोश्याला थांबून तुझ्या केसामधल्या पावसात पुन्हा भिजायला ....
तुझ्या अंगाला स्पर्श करून गेलेला एक एक थेंब डोळेभरून मनात साठवायला ...
प्रत्येक तुषार आपल्या मुठीत कैद करायला ....

गुरुवार, १९ मे, २०११

तुझ्या पैजणांचा नाद रोज ऐकतो ..
मनात त्याने तरंग उठून जातो ...
त्या एका क्षणासाठी मग सारा निसर्गही शांत स्थब्ध होतो ...
जेव्हा प्रेमाने तुझा पाय ताल धरतो ...
दंग होऊन डोलू लागतो साठवत राहतो मग मनात ...
असे जेव्हा होते तेव्हा निसर्ग सजीव पण सोडून वागतो ...
मला समजतच नाही हे असे का होते ?
गूढ मनातले त्याला आपसूक न सांगता ही कळते ...
दूर तो कुठे आहे क्षिताजाला अन मी किनाऱ्यास उभी ....
किती लाटा आल्या तरी किनाऱ्याशी एक ही कायम राहत नाही ...